loader
Breaking News
Breaking News
Foto

कॅप्सन् इन्स्टिट्यूट कोटाचा उपक्रम, जेईई व नीट परीक्षा यशाचा कानमंत्र

कॅप्सन् इन्स्टिट्यूट कोटा मार्फत रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी केईएम मुंबई येथील डॉक्टर महेश अभ्यंकर यांचे अकरावी मधून बारावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट सक्सेस मंत्रा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉक्टर महेश अभ्यंकर हे ग्लोडरमा कंपनीचे डायरेक्टर असून औषध निर्मिती क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व विद्यार्थी मार्गदर्शनात ते अग्रेसर असतात. आजवर सरांनी सतराशेहुन अधिक शैक्षणिक व्याख्याने दिलेली असून त्यांची अनेक पुस्तके तसेच संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन तास चाललेल्या या परिसंवादात सरांनी अभ्यासाबाबतच्या सर्व बाबींना स्पर्श करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थी यशात पालकांचा सहभाग आरोग्य व इतर मूलभूत गोष्टी उलगडून सांगितल्या. कॅप्सन् इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी व्याख्यान दिले. त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थी व पालकांच्यात दिसून आला. सदर कार्यक्रमात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कॅप्सन् इन्स्टिट्यूटचे निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. भावे मॅडम यांनी स्वागत केले व सचिव भातडे यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg