loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाणखवटी गणपती शाळेतील सम्यक मनोज तांबे याची नवोदयसाठी निवड

खेड (प्रतिनिधी) - जि.प.आदर्श शाळा दिवाणखवटी गणपती येथील इ.5वी तील विद्यार्थी सम्यक मनोज तांबे याची राष्ट्रीय स्तरावरील नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झाल्याने शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी आनंदित आहेत. यशस्वी निवडीसाठी विशेष मार्गदर्शन विनोद शंकर लष्कर गुरूजी यांनी दिले. गुरूजींच्या अथक प्रयत्नांनीच या यशाला आकार दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी गुरूजींनी विशेष मार्गदर्शन, अभ्यासाची योजनेची तयारी व मानसिक स्थिती सुधारण्यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सम्यकने नवोदयची परीक्षा उत्तीर्ण केली. केंद्रातील इतर शिक्षकांनीही या यशाबद्दल सम्यकचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती अश्विनी अजय मोरे यांनी सम्यकच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत गुरूजींना धन्यवाद दिले. या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे त्या म्हणाल्या. सम्यक मनोज तांबे आणि विनोद शंकर लष्कर गुरूजी यांच्या या यशस्वी प्रयत्नांची दखल घेत शाळेतल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg