मालवण (प्रतिनिधी) : देवली येथे अवैध वाळू उपसा व डंपरमधून वाळू वाहतूक केल्याच्या आरोपातून प्रभाकर लालु राठोड, रा.कुडाळ, महेश तुकाराम शिरसाट रा.-कुडाळ, आत्माराम जयवंत चव्हाण यांची मालवणचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींतर्फे ऍड. स्वरूप नारायण पई व ऍड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.
दिनांक २२ एप्रिल २०२० रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मालवणचे मंडळ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी अवैध वाळू वाहतुकीची तपासणी करीत देवली काळेथर पुलाच्या नजीक आले असता त्यांना देवली गव्हाणवाडीकडून येणार्या डंपरमध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यामुळे मंडळ अधिकार्यांनी मालवण पोलिस ठाण्यात डंपर चालक व मालक यांचेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६९,३७९,३४ अन्वये वाळूचोरीची फिर्याद दाखल केली. त्यानंतर तपासकामादरम्यान ज्या ठिकाणाहून वाळू भरुन दिली त्या इसमालाही पोलिसांनी आरोपी केले. तपासकाम पूर्ण करून मालवण पोलीसांनी आरोपींविरुद्ध मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी सुनावणी दरम्यान सरकारपक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपींतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मालवण न्यायालयाने आरोपींची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.