loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक समिती शाखा लांजाच्यावतीने विविध स्तरातील यशवंत विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांचा गुणगौरव सोहळा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाच्यावतीने आयोजित तालुक्यातील विविध स्तरातील यशवंत विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांचा गुणगौरव सोहळा नुकताच माऊली सभागृह लांजा येथे उत्साहात पार पडला. प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने सलग २८व्या वर्षी या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सामंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार विजयकुमार पंडित होते. तसेच विलास जाधव, दिलीप महाडिक, राजेश शिर्के, शंकर रणदिवे, संतोष पावणे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, सौ.धामापूरकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, माजी नगराध्यक्ष सुनिल कुरूप, जिल्हा बँक संचालक महेश खामकर, नगरसेवक नंदराज कुरूप आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक, इयत्ता सहावी व नववी नवोदय पात्र विद्यार्थी, नासा, इस्रो भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी तसेच आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक, इयत्ता चौथी सातवी प्रज्ञाशोध गुणवत्ताधारक विद्यार्थी, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा निवड झालेल्या शाळा तसेच निपुण भारत उत्कृष्ट कार्यक्रम अंमलबजावणी शाळा, सेवानिवृत्त शिक्षक या सर्व गुणवंतांचा सत्कार आमदार किरण सामंत व अन्य मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक तालुका शाखा अध्यक्ष दिलीप दिवाळे, सूत्रसंचालन सुरेश आगळे व आभार सचिव दिनेश झोरे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg