loader
Breaking News
Breaking News
Foto

झोंबडी तेलीवाडी येथे श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम सप्ताह उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) : गुहागर तालुक्यातील झोंबडी तेलीवाडी येथे श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम सप्ताह उत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. देवदेवतांच्या कृपा आशीर्वादाने व श्रीराम भाविकांच्या सहकार्यातून श्रीराम मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला. या निमित्ताने श्रीराम सप्ताह उत्सव पार पडला. या श्रीराम सप्ताह उत्सवामध्ये अनेक नामवंत भजनी बुवा व कीर्तनकार यांचे भजन कीर्तन पार पडले. रविवारी श्री राम नवमीच्या दिवशी सकाळी अभिषेक, विधिवत पूजन, श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी श्री राम जन्मकाळ व छबिना, आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद रात्री झोंबडी ग्रामस्थांचे भजन, श्रीराम मंदिरासाठी ज्या दानशूरानी आर्थिक व वस्तुरुपी मदत केली यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ए-वन श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे (भुवडवाडी) यांचे बहुरंगी नमन पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मित्र मंडळ व महिला मंडळ झोंबडी तेलीवाडी यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg