loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर शिवसेना उबाठा पक्षात दाखल, कोकणात कॉंग्रेसला दे धक्का

चिपळूण (ओंकार रेळेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, माजी आमदार गणपत कदम आणि शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील कुणबी समाजाचे मोठे नेते सहदेव बेटकर हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात मात्र त्यांनी आज कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांचा प्रवेश हा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाला बळकटी आणणारा ठरणार आहे, असे म्हटले जात आहे. संगमेश्‍वर, गुहागर, चिपळूण या तालुक्यातील समाजात त्यांची पकड मजबूत आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांची सरस भूमिका ठरली आहे. प्रवेश करतेवेळी त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मारलेली मिठी बरेच काही सांगून गेली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg