loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी भाट्ये बीच येथील श्री झरीविनायक कलशारोहण सोहळा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रचंड उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार

रत्नागिरी (टाइम्स न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी शहरानजीक असलेले श्री गणरायाचे साक्षात रुप दर्शविणारे प्रसिद्ध श्री झरीविनायक मंदिर आज शेकडोंच्या मोठया गर्दीने भरुन गेले. मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापणा व धार्मिक विधी संपन्न झाले. परिसरात प्रचंड उत्साह आणि भावनिक वातावरण तयार झाले होते. त्यातच भाट्ये बीच येथील श्री झरीविनायक कलशारोहण सोहळा भक्तीपूर्ण व भावपूर्ण वातावरणात पार पडला. समुद्राच्या लाटा आज उसळल्या होत्या आणि वारादेखील मंदिराच्या दिशेने घोघावत होता. सनई वाद्यात मान्यवरांचे स्वागत झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाणीज पीठाचे स्वामी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला. धार्मिक विधीसह सोहळा पार पडला. जगद्गुरुंच्या हस्ते श्रीमुर्ती स्थळ अनावरण करण्यात आले. यावेळी काकड आरती व श्री गणेश स्तोत्र पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी मंत्री आणि भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण, उद्योजक रोशन फाळके, उदय बने, आबा घोसाळे आणि भाट्ये गावातील भाटकर, पिळणकर कुटुंबिय उपस्थित होते. रत्नागिरी भाट्ये येथील जागृत श्री झरीविनायक मंदिराचे नूतन बांधकाम झाल्यानंतर आज कलशारोहण सोहळा पार पडला. या सोहळ्याला असंख्य भाविक उपस्थित होते. भाट्ये बीच येथील श्री झरीविनायक मंदिराच्या परिसरात भक्तीपूर्ण वातावरण तयार झाले होते. शेकडों भाविकांनी श्री झरीविनायकाचे दर्शन घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg