देवरूख (सुरेश सप्रे) : भूस्खलन होवून जवळपास दोन वर्षे झाली तरी शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने कोंढ्रण गाव ईशाळगड होण्याची वाट बघत आहे का? कोंढ्रण गावातील ग्रामस्थांवर जीवमुठीत घेत जीवन कंठण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपणच कैवारी असल्याचा देखावा करून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे व औदार्य दाखविणार्या नेते मंडळींसह त्यांच्या स्थानिक बगलबच्चांनी पुर्नवसन करू अशी टिमकी वाजवली होती. निवडणूक झाल्यानंतर मात्र टिकटिक बंद करत पांढरे निशाण हाती घेतल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. काहींनी तर अधिकारीवर्गाला हाताशी धरत गावाचे पुर्नवसन (नियमाने न होणारे) करण्यासाठी नियमांकडे काना डोळा करत गाजराची पुंगी वाजविणेचा प्रयत्न करत गावात दोन गट निर्माण केले. पण ती शासनाच्या भूगर्भीय सर्वेक्षणात ते फोल ठरले आहे.
देवरूख पासून जवळच असलेल्या कोंढ्रण गावात २७ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता गावाच्या मागच्या उतारावरील रस्त्यावर भुस्खलन झाल्याने एकढिगारा कोसळला होता. याची दखल घेत महसूल विभागासह अनेक राजकीय नेत्यांनी जीवीत हानी टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून गावातील लोंकासह गूरेढोरांचे जवळच स्थलांतर करून गाव रीकामा केला होता. कोंढ्रण गावाच्या पूर्वेकडील भागात, कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु रस्ता खचून गावाकडे जाणार्या रस्त्याच्या काही भागाचे (५० मीटर) नुकसान झाले आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण, राज्य एकक: महाराष्ट्र, पुणे यांना तहसीलदार संगमेश्वर यांनी दि. ०७/०६/२०२४ रोजी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण, पुणे यांना घटनेबद्दल माहिती दिली. भूस्खलनामुळे गावाकडे जाणार्या रस्त्याचे नुकसान झाले असून भविष्यातील धोका असल्याने त्याचे मूल्यांकन करण्यासाठी गावाचे भूगर्भीय मूल्यांकन करण्याची विनंती केली होती. उपरोक्त विनंती नुसार २२.०८.२०२४ रोजी वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ यांनी या परिसराला भेट दिली आणि संबंधित क्षेत्राचे जलद आपत्तीनंतरचे भूगर्भीय मूल्यांकन केले. २७ जुलै २०२३ रोजी, मुसळधार आणि सततच्या पावसामुळे गावाच्या मागील उतारावर ढिगारा कोसळला. गावाचा वरचा उतार कमी उंचीचा आहे. गावाचा खालचा उतार थोडासा कललेला आहे. गावातील सापेक्ष भूस्खलन ८०-१०० मीटर दरम्यान आहे. गावातील वस्तीच्या मागील उतारावर नैसर्गिक निचरा नाही. या गावातील वस्तीपासून ५० मीटर अंतरावर संपूर्ण मागचा उतार १.५ ते २ मीटर जाडीच्या ओव्हरबर्डन मटेरियलने झाकलेला असतो ज्यामध्ये वाहतूक केलेली माती आणि जागेवर असलेली माती याचा पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी योग्य निचरा होत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वापरले जाते व पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून जाते. झिरपून जमिनीच्या समांतर भागात काही भेगाही निर्माण झाल्या आहेत.
२०१९ आणि २०२१ या वर्षात मागच्या उतारावर असलेल्या जाड ओव्हरबर्डन मटेरियलमध्ये गावातील वस्ती आणि रस्त्याच्या पातळीच्या अगदी वर त्या भेगांच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. गावाच्या मागे डांबरी रस्त्यावर सर्वात मोठ्या भेगा आहेत, रस्त्याच्या कडेला असलेले सर्व कच्चे नाले स्लाईड कचर्याच्या साहित्यामुळे बंद झाले असून स्लाईड झोनच्या जवळपासच्या भागात काही प्रमाणात उन्मळून पडलेली आणि झुकलेली झाडे देखील आहेत. एक गाव रस्ता मध्यभागी उतारावर आहे. पायथ्याशी उतारावर वस्ती आणि शेतीची जमीन आहे. कोंढ्रण गावाजवळ भूस्खलनामुळे गावाकडे जाणार्या रस्त्याचे नुकसान झाले आणि भविष्यातील धोका असल्याने तो टाळण्यासाठी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. यावर पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असताना ही याकडे संबधीत अधिकारी वर्ग ठोस कार्यवाही करताना दिसत नसल्याने ईशाळगड होण्याची वाट बघत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.