loader
Breaking News
Breaking News
Foto

रोहा: 2 वर्षांच्या नातवासहीत गच्चीवरुन मारली उडी, आजीचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी चिमुकल्याने जीव सोडला

रायगडमधील रोह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेने तिच्या 2 वर्षांच्या नातवाईसहीत इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेनं रोह्यात एकच खळबळ उडाली असून या महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं यामागील गूढ वाढलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

52 वर्षीय महिलेने तिच्या अवघ्या 2 वर्षांच्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या घटनेत उंचावरुन पडल्याने अती रक्तस्राव झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या 2 वर्षांच्या नातवाला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. रोहा-कोलाड रोड लगत असलेल्या ओम चेंबर इमारतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव उर्मिला सिद्धाराम कोरे असं आहे. उर्मिला यांनी बुधवारी (9 एप्रिल 2025 रोजी) बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमार उर्मिला त्यांच्या नातवाला घेऊन गच्चीवर गेल्या आणि त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता खाली उडी मारली. या घटनेत नातवाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र रुग्णालयात नेलं जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.52 वर्षीय महिलेने तिच्या अवघ्या 2 वर्षांच्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या घटनेत उंचावरुन पडल्याने अती रक्तस्राव झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या 2 वर्षांच्या नातवाला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. रोहा-कोलाड रोड लगत असलेल्या ओम चेंबर इमारतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg