ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात मुंब्य्रात मानवतेच्या क्रूरतेचा अंत पार केल्याची घटना घडली. मुंब्र्यात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची धारदार शस्त्राने हत्या करीत नराधमाने तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना मुंब्य्राच्या ठाकूरपाडा परिसरात सोमवारी रात्री (दि. ०७ एप्रिल) घडली. या घटनेमुळे मुंब्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी नराधम आसिफ मन्सुरी (२०) रा. सुल्तानपुर, बिहार याच्या मुसक्या आवळल्या असुन आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली.
ठाणे पोलीस आयुयक्तालय परिसरात असलेल्या मुंब्रा ठाकुरपाडा येथील श्रद्धा प्राप्ती टॉवर परिसरात मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीला नराधम आसिफ मन्सुरी याने खेळणी देण्याचे आमिष दाखवून अपहरण करीत त्याच्या घरी नेले. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत असलेल्या आसिफने या चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार करून धारदार शस्त्राने मानेवर वार करून तिला ठार मारले. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बाथरूमच्या डकमधुन खाली फेकून दिला. दरम्यान सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर राहणार्या रहिवाशांच्या डकमध्ये काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. तसेच पाइपलाइन देखील तुटली. त्याठिकाणी चिमुकलीचा मृतदेह अर्ध निर्वस्त्र आढळून आल्याने ही भयंकर घटना उघडकीस आली. यादरम्यान सोमवारी रात्री ११ वाजताचे सुमारास काही महिला व पुरुष यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात येवुन कळविले की, ते राहत असलेल्या बिल्डिंग डक्ट मध्ये काहीतरी उंचावरून पडल्याचे आवाज आल्याने त्यांनी खिडकी ओपन करून टॉर्च लावून बघितले असता त्यामध्ये ,एक लहान मुलगी वय अंदाजे दहा वर्षे ही पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आल्याचे त्यांनी कळविले-सदर प्रकरणी मुंब्रा पोलीस चे अधिकरी व अंमलदार यांनी घटनास्थळ जावुन घटनेची खात्री करून पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.
वैदयकीय अधिकारी अश्विन केनेडी व डॉ असमा नसरीन यांनी मयत मुलीचे शवावविच्छेदन करून मारण्याचे कारण “ Hemorrhage and shock due to stab injury over neck earring to vital structures with evidence of sexual assault “ असे दिल्याने शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या केल्याचे उघड झाले.याप्रकरणी आरोपी आसिफ अकबर मंन्सुरी, रा. रूम नं 603, श्रध्दा प्राप्ती टॉवर, ठाकुरपाडा, मुंब्रा याचे विरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि-नंबर 577/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 96, 137(2), 64, 65(2), 64(आय),238 सह बालकांचे लैगिग अत्याचार प्रतिबंध अधिनिमय सन 2012 चे कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंद करून, त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे- आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्याची तजविज ठेवली असुन परीसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.