संगमेश्वर (प्रतिनिधी) : संघर्ष मित्र मंडळ, कडवई धामणाकवाडी यांच्यावतीने आपल्या कोकणातील विविध लोककलांचा प्रसार करणार्या व्यक्तींना सन्मानित करून पुरस्कार दिले जातात. ओम् सद्गुरु स्वामी उदयानंदगिरी महाराज, सदगुरु ओम् स्वामी विद्यानंदगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने सर्व मंडळींच्या सहकार्याने तसेच श्री क्षेत्र टिकळेश्वर देवस्थानचे सर्वस्वी संतोष ऊर्फ दादा महाराज काताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओम् स्वामी उदयानंदगिरी, ओम् स्वामी विद्यानंदगिरी सेवा मंडळ चिपळूण यांच्या नमन कार्यक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या शाहिर विजय भोजने यांना संघर्ष मित्र मंडळ, कडवई (धामणकवाडी) आयोजित जल्लोष २०२५ या कार्यक्रमात संगमेश्वर कोकण कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या ३० वर्षांपासून लोकपरंपरेतील नमन, गणेश आराधना, गौळण अशा विविध गाण्यांची स्वतः गीतरचना करून ती आपल्या सुमधुर आवाजात सादर करणार्या शाहीर विजय भोजने यांनी नमन परंपरेमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. तसेच स्वामींच्या अभंग, गजर, आरती यांची स्वतः रचना करून ती भक्तिभावाने सादर करून कलाप्रेमी रसिकांची मने जिंकली आहेत. कोकणातील लोककलेतील सुप्रसिद्ध शाहीर भिकाजी बुवा चोगले यांच्या समवेत जाखडीसारख्या लोकपरंपरेत अनेक सुपरहिट गाणी गायन करणार्या विजय भोजने यांनी नमन कार्यक्रमात युवराज, भिल्लपुत्र, राजकुमार अशा अनेक विलोभनीय भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या या अप्रतिम कार्याची दखल घेत संघर्ष मित्र मंडळ, कडवई (धामणाकवाडी) यांच्यावतीने संगमेश्वर कोकण कला रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.