रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरीतील खळाळता समुद्र आणि निसर्गरम्य परिसराच्या पार्श्वभूमीवर वसलेल्या भाटये परिसरातील श्री देव झरी विनायक मंदिराचा जीर्णोद्धार, श्रींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवार दि.९ एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुधवारी सकाळी सुरू झालेला हा सोहळा शुक्रवार दि.११ रोजीपर्यंत चालणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी सारी भाट्ये नगरी सजली आहे. तसेच ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने गणेशभक्त, भाविक, पर्यटक श्री गणरायाच्या मंदिराचा नवा साज पाहण्यासाठी आणि श्रींच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. हा मंगलमय सोहळा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. बुधवारी सकाळी त्यांचे भाट्ये गावातून वाजत-गाजत मिरवणूकीने स्वागत करण्यात आले, तेव्हा सारा परिसर चैतन्यमय झाला होता.
श्री झरी विनायक मंदिर हे रत्नागिरीगिरीतील एक प्रसिध्द मंदिर असून श्री देव विनायक हे जागृत दैवत असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. पर्यटक म्हणून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने श्री विनायकाच्या दर्शनासाठी वर्षभर येत असतात. समुद्र तटावर आणि अगदी रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचा भव्य असा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. अतिशय देखणे असे हे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराची रचना दाक्षिणात्य शैलीत आहे. त्यामुळे रस्त्यावरून हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील स्व.वनिता सीताराम शेट्टी यांच्या स्मरणार्थ गणेशभक्त सीताराम शेट्टी यांनी आपल्या ऑनशोअर कन्ट्रक्शन कंपनी, मुंबई यांच्या सौजन्याने हे मंदिर उभारले आणि बुधवारी भव्य सोहळ्याद्वारे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराचे मंदिाचे कलशारोहण करण्यात आले. मंदिरातील सर्व विधी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनाखाली यथोचित करण्यात आले. यावेळी सकाळी स्वस्ति पुण्ययवाचन, २४ नारळ गणयाग, नवग्रह पूजा, श्री गणपती देवाची प्रतिष्ठापना, शिखर प्रतिष्ठा, वृषभ लग्न मुहुर्तावर लग्न लावण्यात आले. त्यानंतर प्रार्थना होम, गणपती देवाचा ब्रह्मकलशाभिषेक करण्यात आला. सायंकाळी स्वस्ति पुण्यवाचन, भूमीशुध्दी, खानदानी सप्तशुध्दी, गोपूजा, वास्तू विद्यायाग, वास्तूबळी, श्री गणपती देवासाठी रंगपूजा असे विधी पार पडले. याशिवाय गुरूवार दि.१० व दि.११ रोजीही विविध धार्मिक विधी याठिकाणी पार पडणार आहेत.
या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, तसेच आ.रविंद्र चव्हाण, माजी आमदार राजन साळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष सुयोग दळी, विवेक सुर्वे, उदय बने, राहुल पंडित, सुरेश मयेकर, विजय खेडेकर, जयसिंग घोसाळे, महेश म्हाप, बिपीन बंदरकर, सरपंच पराग भाटकर, रोहिदास भाटकर, रोशन फाळके, भाजपचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर, झरी विनायक मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रत्नागिरीतील भाविकही सोहळ्यास प्रचंड संख्येने उपस्थित होते. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी मंदिर उभारणीत तन-मन-धनाने पुढाकार घेणारे सीताराम शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. उदय सामंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.