loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पहाल ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत दोन सत्रामध्ये बारावी अंतिम परीक्षा यशस्वीरित्या पार पाडल्या. परीक्षा संपल्यानंतर, राज्यभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आता त्यांच्या बारावीच्या निकालाची 2025 ची वाट पाहत आहेत. हे निकाल आपण ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे देखील पाहू शकता. अर्थात, महाराष्ट्र मंडळाने बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी, मागील वर्षांच्या ट्रेंडनुसार तो मे २०२५ मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. २०२४ मध्ये, बोर्डाने 19 मार्च रोजी परीक्षा संपल्यानंतर लगेचच २१ मे रोजी निकाल जाहीर केले होते. दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वीच म्हटले आहे की, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीचा निकाल येत्या 15 मेपूर्वी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थी, पालक किंवा शैक्षणिक वर्तुळातील कोणताही व्यक्ती, सामान्य नागरिक जर इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल पाहू इच्छि असेल तर त्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळे आपण पाहू शकता. mahahsscboard.in , mahresult.nic.in

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

कधी कधी अधिकृत संकेतस्थळांवर ताण वाढल्याने त्यांचा वेग मंदावतो आणि ती धिम्या गतीने काम करु लागतात. अशा वेळी इंटरनेटपेक्षाही एसएमसएस सेवा अधिक फायद्याची ठरु शकतो. विद्यार्थी बोर्डाने प्रदान केलेल्या एसएमएस सुविधेचा वापर करू शकतात: तुमच्या मोबाइल फोनवर एसएमएस अॅप उघडा. टाइप करा: MHHSC आसन क्रमांक 57766वर मेसेज पाठवा. तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल एसएमएसच्या उत्तराच्या स्वरूपात मिळेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg