loader
Breaking News
Breaking News
Foto

उन्हाळ्यात आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे?

यंदा कोकण स्तरावर उन्हाची तीव्रता एप्रिल महिन्यापासूनच जाणवू लागली आहे. हेच तापमान मे महिन्यात अधिक वाढणार आहे. त्यामुळे उन्हापासून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रामुख्याने शरीर डी हायड्रेशनला बळी पडते. आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, ओठांचा कोरडेपणा ते मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या उद्धभवतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काकडीत ९६ टक्के पाणी असल्याने शरीराला ते थंड करते. उन्हाळ्यात सॅलडमध्ये त्याचा वापर करणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये ९४ टक्के पाण्याचे प्रमाण आहे. लाइकोपिन नावाचे ऍन्टी ऑक्साईड टोमॅटोत असल्याने त्वचा व हृदयासाठी आवश्यक आहे. स्ट्रॉबेरी, टरबूज, संत्री, खरबूज ही फळे उन्हाळ्यात अवश्य खायला हवीत. जेणेकरुन शरीराला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिनसह आवश्यक पोषक घटक मिळाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल. नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप हितकारक आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg