जागतिक पातळीवर बऱ्याच उलथापालथी सुरु आहेत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि इतर गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होताना दिसून येत आहे. असं असताना काही सिद्ध प्राप्त व्यक्तींकडून भाकीतं वर्तवली जात आहे. काही भाकीतं खरी ठरत असल्याने आपसूक विश्वास बसत आहे. दरम्यान, 2025 हे वर्ष अशुभ असल्याचं मानलं जात आहे. म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपानंतर चीन आणि आता जपानच्या बाबा वेंगाने एका मोठ्या संकटाचं भाकीत वर्तवलं आहे. जपानच्या बाबा वेंगाच्या मते, त्सुनामी येण्याची शक्यत आहे. त्याचा परिणाम थेट जपान आणि इंडोनेशियासारख्या देशांवर होणार आहे.
रिपोर्टनुसार, बाबा वेंगा नावाने प्रसिद्ध असलेल्या रियो तुतुस्कीने एक भीतीदायक भविष्य वर्तवलं आहे. त्याच्या मते, जुलै 2025 मध्ये मोठं संकट येणार आहे. संपूर्ण जगाला एका मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. भूकंप येणार असं भाकीत याच वर्षी जानेवारीत बाबा वेंगाने वर्तवलं होतं. वेंगाने तेव्हा सांगितलं होतं की, तैवान-जपान-हाँगकाँग आणि इंडोनेशियात भयानक भूकंप होणार आहे. तेव्हा याकडे लक्ष दिलं गेलं नाही. पण म्यानमारमध्ये भूकंप झाल्यानंतर जपानचा बाबा वेंगा चर्चेत आला आहे.
टाइम्स स्पेशल
बाबा वेंगाने 1995 मध्ये पहिलं भाकीत वर्तवलं होतं. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, 2020 मध्ये जगावर एका व्हायरसचं संकट घोंगावणार आहे. याच वर्षी जगावर कोरोना व्हायरसचा प्रभाव दिसला. संपूर्ण जग या कालावधीत भयभीत आणि थांबलं होतं. बाबा वेंगाने 1991 मध्ये फ्रेडी मर्करी यांचा मृत्यू होईल असं सांगितलं होतं. काही महिन्यातच मर्करी यांचा मृत्यू झाला. इतकंच काय तर ब्रिटेनची राजकुमार डायनाबाबतचं भाकीतही खरं ठरलं होतं.बाबा वेंगाच्या भाकीताचा भारतावर काय परिणाम होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर 2004 मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या त्सुनामीचा प्रभाव भारतावरही झाला होता. दुसरीकडे, चीनच्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला तर चित्र खूपच भयानक असू शकतं. भारत आणि चीन अगदी जवळ आहेत. त्याचा परिणाम उत्तर भारतात दिसून येऊ शकतो.बीजिंग भूकंप संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक अहवाल सादर केला आह. यात त्यांनी लिहिलं आहे की, चीनच्या आसपास मोठ्या भूकंपाची शक्यता आहे. हुनान आणि हिमालयाजवळ भूकंप होऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता 8 रिश्टर स्केल असू शकते. पण हा भूकंप कधी होईल याबाबत काही शक्यता वर्तवलेली नाही. म्यानमारमध्ये मागच्या महिन्यात 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा तीन हजाराहून अधिक लोकांना मृत्यू झाला होता.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.