उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाआधीच तिची आई गायब झाली आहे. मुलीचं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं, त्या मुलाचाही पत्ता लागत नाहीय. काही दिवसानंतर माहित झालं की, सासू तिच्या जावयासोबत फरार झालीय. सर्वात धक्कादायक बाब म्हणचे मुलीच्या आईने घरातील दागिनेही लंपास केल्याची माहिती समोर आलीय. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायब झालेल्या माहिलेचा आणि त्या मुलाचा त्यांचे कुटुंबीय शोध घेत आहेत. दरम्यान, हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं असून पोलिसांकडूनही बेपत्ता झालेल्या महिलेचा आणि मुलाचा शोध घेतला जात आहे. या व्हायरल लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. ही धक्कादायक घटना अलिगढच्या मडराक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहरपूर गावात घडली. येथील जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. या घटनेमुळं पोलिसही थक्क झाले आहेत. जितेंद्रच्या मुलीचं 16 एप्रिलला लग्न होतं. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या होत्या. कुटुंबात मुलीच्या लग्नाची तयारीही सुरु होती. परंतु, सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात आकंड बुडाली अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सासू-जावयाने संधी मिळताच परिसरातून धूम ठोकली. इतकच नव्हे तर त्या महिलेनं घरातील दागिनेही लंपास केले.
टाइम्स स्पेशल
पीडित पती जितेंद्रने म्हटलंय की, ज्या मुलासोबत त्यांच्या मुलीचं लग्न होणार होतं. तो मुलगा मुलीच्या आईसोबत फोनवर तासनतास बोलायचा. जितेंद्र म्हणाला, मी बंगळुरुत नोकरी करतो. जेव्हा मी तीन महिन्यानंतर मुलीच्या लग्नासाठी घरी आलो. तेव्हा मी पाहिलं की माझी पत्नी होणाऱ्या जावयासोबत फोनवर खूप जास्त बोलते. 24 तासांपैकी 20 तास दोघेही फोनवर बोलायचे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.