loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श शिक्षक मकरंद गणपत विचारे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न ---

वरवेली (गणेश किर्वे)- गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे ग्रामस्थ व चिखली मांडवकरवाडी प्राथमिक शाळेतून वयोमानानुसार निवृत्त झालेले जिल्हा परिषद आदर्श शिक्षक मकरंद गणपत विचारे यांनी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात 36 वर्षे 8 महिने सेवा पूर्ण करुन ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा भवानी सभागृह शृंगारतळी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान मंडळ, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सुदेश कदम, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष भगवान कदम, अमिष कदम, डॉ. प्रकाश शिर्के, वरवेली मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अशोक मोहिते, चिखली मांडवकरवाडी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनुजा राऊत, सामाजिक कार्यकर्ते साबिर साल्हे, निवृत्त केंद्रप्रमुख विनायक ओक, केंद्रप्रमुख लोहकरे, शिक्षण विस्तार अधिकारी मोहन उकार्डे, शिक्षक नेते बळीराम मोरे दीपक शिंदे, शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष अरविंद पालकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे, वरवेली सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, क्षत्रिय मराठा मंडळ वरवेली अध्यक्ष दिलीप (शामराव)विचारे, यांच्यासह विचारे परिवार, कुटुंबीय सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमामध्ये मकरंद विचारे गुरुजी यांनी ज्या शाळांमध्ये कामकाज केले त्या शाळांतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतमध्ये विचारे गुरुजी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच मकरंद विचारे यांच्यासारखा आदर्श शिक्षकाच्या जीवनावर एक पुस्तक त्यांच्या पत्नी जेष्ठ कवी लेखक ममता विचारे यांनी लिहावे तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून गुरुजींनी केलेले शिक्षण क्षेत्रातील कार्य आजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समोर यावे असे मत व्यक्त केले. एक आदर्श शिक्षक मकरंद विचारे गुरुजी यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यासाठी शुभचिंतकांची अलोट गर्दी झाली होती. गुरुजी तुम्ही पुन्हा या म्हणत एका चिमुकल्या विद्यार्थ्याने भावनिक साद दिली. 36 वर्षाच्या दीर्घ सेवेत दोन शाळांना आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त करून देणार्‍या एक निसर्गप्रेमी, कृषी प्रेमी, विज्ञान प्रेमी, शिक्षण प्रेमी असे सर्व गुण संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती ग्रामस्थांच्या मनाला नक्कीच चटका लावणारी ठरली आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी निवृत्त केंद्रप्रमुख राजेंद्र विचारे, पाटपन्हाळे शाळेचे माजी विद्यार्थी मनीष चव्हाण, पालपेणे तळ्याची वाडी शाळेचे माजी विद्यार्थी करण आदवडे, मांडवकरवाडी अध्यक्ष सचिन राऊत, निगुंडळ शाळेचे माजी विद्यार्थी संदीप खोले त्याचप्रमाणे सर्व विचारे कुटुंबीय व परिवार सर्व माजी विद्यार्थी यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg