loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले येथील हत्ती हल्यात ठार झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : मंगळवारी सकाळी मोर्ले गावात काजू बागेत जाणार्‍या शेतकरी लक्ष्मण गवस यांच्यावर ओंकार टस्कर हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर संपूर्ण मोर्ले गावात, तालुक्यात वातावरण संतप्त झाले होते. जंगली हत्ती पकड मोहीम, तसेच तातडीने नुकसान भरपाई यासाठी जवळपास आठ तास संबंधित अधिकारी यांना गावात रोखून धरले होते. अखेर ग्रामस्थ यांच्या रोषासमोर प्रशासन नमले. तातडीने ओंकार टस्कर हत्तीला जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर लक्ष्मण गवस कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून तात्काळ दहा लाखांचा धनादेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्ले येथील घटनेनंतर सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आठ तास गावात रोखून ठेवले. यानंतर माणसांचा जन आक्रोश काय असतो हे कळून चुकले. प्रशासकीय अधिकारी यांना गावच्या उद्रेक आक्रोश पाहुन हत्ती पकड मोहीम बाबत टोलवाटोलवी करणारे वन अधिकारी यांचे डोके जाग्यावर आले. वन अधिकारी यांनी पंचवीस लाख भरपाई पैकी दहा लाख रुपये धनादेश मंगळवारी रात्री कुटुंबाला दिला तर उर्वरित पंधरा लाख दिड महिन्यात दिले जातील असे सांगितले. तर मोर्ले गावातील ओंकार टस्कर हत्तीला जेरबंद करण्याचे आदेश तातडीने दिले. ग्रामस्थ यांनी प्रशासनाचे तोंड दाबल्यावर नाक उघडले, असाच एकंदर प्रकार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg