loader
Breaking News
Breaking News
Foto

माऊली उद्योग समूहाच्या वतीने लांजा पोलीस ठाणेला सॅनेटरी पॅड डिस्पोजल मशीन भेट ---

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर)- लांजातील माऊली उद्योग समुहाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत लांजा पोलीस ठाणेला नुकतीेच सॅनेटरी पॅड डिस्पोजल मशीन भेट स्वरूपात देण्यात आली. महिलांना मासिक पाळीच्या काळात योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीतही महिलांना येणार्‍या अडचणी हा मोठा विषय आहे. त्यामुळे अशा सुविधा महिलांना मिळाव्यात असे वाटत असले तरी मात्र आजही त्याचा अभाव आहे. याचीच जाणीव ठेवत लांजातील माऊली उद्योग समूहाच्यावतीने लांजा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचार्‍यांना सॅनेटरी पॅड डिस्पोजल मशीन भेट स्वरुपात देण्यात आली. दरम्यान, ही भेट स्वीकारताना लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी माऊली उद्योग समुहाचे आभार व्यक्त केले. यावेळी माऊली उद्योग समुहाचे विकास शेट्ये यांच्या सह त्यांचा मुलगा प्रवीण शेट्ये, मुलगी दर्शना शेट्ये तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे आणि महिला पोलीस अंमलदार सौ. रेहाना नावलेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg