loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा बागेश्री शाळेतील ऋत्वी आगरेचे मंथन परीक्षेत यश ---

केळंबे लांजा(सिराज नेवरेकर)- लांजातील जिल्हा परिषद मराठी शाळा बागेश्री मधील विद्यार्थीनी कु. ऋत्वी अजय आगरे हिने मंथन परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. तिने या परीक्षेत राज्यात नववा व रत्नागिरी जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता बागेश्री शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये सतत जनजागृती करण्यात येते. ऋत्वीच्या या यशात तिचे वडील अजय आगरे, आई प्रांजल आगरे आणि वर्गशिक्षिका नंदिनी पेडणेकर-पाटोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता पाटील, केंद्रप्रमुख श्री. पावसकर यांनी तिचे कौतुक केले आहे. ऋत्वीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg