loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रा. पं. सरपंच पदासाठी २३ एप्रिल रोजी आरक्षण सोडत

म्हसळा (वार्ताहर) : सन २०२५-३० या कालावधीसाठी म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचा आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवार २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदे ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब ५ मार्च २०२५ अन्वये सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात आली असून त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे - खुला १ व महिला १, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे - खुला २ व महिला २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे - खुला ६ व महिला ५ आणि खुला प्रवर्ग - खुला १० व महिला १२ अशा एकूण ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. ३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पद आरक्षित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे . अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. तसेच यावेळी नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg