loader
Breaking News
Breaking News
Foto

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा 26 रोजी हिरकमहोत्सव समारोप सोहळा ---

मालवण(प्रतिनिधी)- मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार दि. 26 एप्रिल रोजी होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी विविध प्रमुख पाहुणे, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकुर यांनी दिली. मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, संदेश कोयंडे, भाऊ सामंत, विजय, केनवडेकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रदीप नाईक-साटम आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी कार्यक्रमांची रुपरेषा स्पष्ट केली. सकाळी 9 वाजता कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते फन फेअरचे उद्घाटन, 10 वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन होईल. नंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात होऊन त्यामध्ये मान्यवरांसह प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, कॉलेजचे आजपर्यंतचे जनरल सेक्रेटरी, विद्यापीठ प्रतिनिधी, विद्यार्थिनीं प्रतिनिधी, गेल्या दहा वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार होणार असल्याचे प्राचार्य ठाकुर यांनी सांगितले. माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी यांनी दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांच्या होणार्‍या कार्यक्रमांची रुपरेषा स्पष्ट केली. दुपारी 3 वाजता माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन, माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा, मनोगते, चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. माजी विद्यार्थ्यांतर्फे मान्यवरांचे सत्कार व सन्मान तसेच माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेकडून निधी गोळा करण्यात येत असून कमीत कमी खर्च कार्यक्रमावर करून उर्वरित निधी कॉलेजच्या शैक्षणिक उपक्रमासाठी खर्च करण्यात येईल, असे धुरी यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास उपस्थित राहवे, असे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg