loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत पंप हाऊस फोडून 52 हजारांचा ऐवज लंपास ---

संगलट(खेड)(प्रतिनिधी)- दापोली तालुक्यातील नवानगर तांबडीकोड येथे अज्ञात चोरट्याने एका पंप हाऊसचे कुलूप तोडून आत ठेवलेले सुमारे 52 हजार 600 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 4 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ततीक्षा सुदर्शन गायकवाड (44, रा. दापोली काळकाईकोड) यांच्या नवानगर तांबडीकोड येथील जमिनीमध्ये बांधलेल्या पंप हाऊसमध्ये चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पंप हाऊसच्या सिमेंटच्या दरवाजाची कडी वाकवून व दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत ठेवलेले कंपाऊंडसाठी वापरण्यात येणारे 48 हजार रुपये किमतीचे लोखंडी 4 फूट उंच व 50 फूट लांबीचे तारेचे 8 बंडल, 2000 रुपये किमतीचा पाण्याचे बोरिंगचा स्टार्टर, 2400 रुपये किमतीच्या 100 फूट लांबीच्या गुलाबी व केशरी रंगाच्या 1 इंची मापाच्या दोन पाण्याच्या पाईप्स, 200 रुपये किमतीच्या दोन लोखंडी पहारी आणि 1000 रुपये किमतीच्या एसीसी सिमेंटच्या 03 बॅगा, असा एकूण 52 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरीची तक्रार ततीक्षा गायकवाड यांनी दापोली पोलीस ठाण्यात 8 एप्रिल 2024 रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg