loader
Breaking News
Breaking News
Foto

नशेचा खर्च भागविण्यासाठी युट्यूबवर ट्रेनींग घेऊन रिक्षा चोरी करणारा उच्चंशिक्षित तरुण पोलिसांच्या जाळ्यात ---

ठाणे (प्रतिनिधी )- उच्चशिक्षित एम कॉम शिक्षण असलेल्या आणि आय टी कंपनीमध्ये डाटा एंन्ट्री ऑपरेटरचे काम करणार्‍या युवकाने पत्नी सोडून गेल्याने नशा करण्यासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी रिक्षा चोरीच्या प्रकरणाची उकल नौपाडा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. आरोपी शबाब हुसेन नायाब हुसेन रिझवी सैयद (41) असे चोरट्याचे नाव असून त्याने दुबई येथे एअरपोर्टवर ड्रायव्हिंगचे काम केले असल्याचे समोर आले आहे. गोपनीय बातमीदाराकडुन पोलीसांना बातमी मिळाली की, संशयित इसम हा नौपाडा परिसरात रिक्षा चोरी करण्यासाठी येणार आहे. सदर बातमीवरून पोलीसांनी पाचपाखाडी ओपन जिम परिसरात सापळा रचुन आरोपी शबाब हुसेन नायाब हुसेन रिझवी सैयद, वय 41 वर्षे, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे यास अटक करून त्याचेकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्याने नौपाडा, वागळे इस्टेट, राबोडी इत्यादी पोलीस ठाण्याचे हद्दीत वाहन चोरीचे व इतर चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपीकडे केलेल्या चौकशी मध्ये सदर आरोपी हा उच्च्शिशिक्षित असल्याचे त्याने सांगितले आहे. आरोपीस काही वर्षापुर्वी त्याची पत्नी सोडुन गेल्यामुळे तो नशेच्या आहारी गेला व त्याने नशा करण्यासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी रिक्षा व वाहन चोरी करण्यास सुरवात केली. आरोपीने यु ट्युब वरून रिक्षाचे स्विच कसे असते व ते कसे तोडायचे याचे व्हिडीओ पाहुन रिक्षा व दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. रिक्षा चोरल्यानंतर सदर आरोपी हा रिक्षा मध्ये पेट्रोल आहे तो पर्यत रिक्षाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करून त्याव्दारे येणार्‍या पैश्यांमध्ये तो नशा करायचा. व पेट्रोल संपल्यानंतर तो रिक्षा सोडुन दयायचा. शबाब याने दुबई येथे विमानतळालगत वाहन चालक म्हणूनही काम केले. सदर कामगिरी सुभाष बुरसे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, ठाणे, प्रिया ढमाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नौपाडा विभाग, अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे, शरद कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोहवा राजेंद्र गायकवाड, पाटील, विलास देसाई, सचिन रांजणे, ईश्वर गोलवड, मेहरबान तडवी, पोअं/सारंग कांगणे, गंगाधर तिर्थकर यांनी केलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास सपोनि मंगेश भांगे हे करीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg