रत्नागिरी : बुद्धगया मुक्ती चळवळीसाठी 1949 च्या कायद्यात सुधारणा आणि व्यवस्थापन समितीत बौद्धांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ, मुंबई, भारतीय बौध्दमहासभा रत्नागिरी, बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भिम आर्मी रत्नागिरी, वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने बुधवार दि. 9 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. बुद्धगया महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्ध समाजाच्या ताब्यात दिले जावे आणि व्यवस्थापन समितीतील सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत, बुद्धगयाच्या प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी प्रशासनातील कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नवीत तरतुदी लागू कराव्यात, बुद्धगयाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी लागू कराव्यात, बुद्धगयाच्या संवर्धन आणि विकासामध्ये स्थानिक बौद्ध समुदायाचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करणार्या आवश्यक तरतुदी समाविष्ट कराव्यात, बुद्धगयाच्या संवर्धन, सुधारणा आणि पुनर्स्थापनेसाठी सरकारने विशेष आर्थिक मदतीची आणि अनुदानाची तरतूद करावी, ईव्हीएस, महापुरूषांचा अपमान, ओबीसी जनगणना आंदोलनाचा चौथा टप्पा इत्यादी प्रमुख मागण्याचे निवेदन राष्ट्रपतींना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामाफर्र्त देण्यात आले.
यावेळी संजय आयरे, संजय कदम, प्रदिप पवार, राजेंद्र कांबळे, प्रकाश पवार, एल. व्ही, पवार, सुरेश मोरे, विजय पवार, भगवान जाधव, विशाल सावंत, मंगेश गमरे, सुनिल होवाल, सुबोध जाधव, वि. ल. मोहिते, डॉ. संजय कांबळे-बापेरकर, विठोबा पवार, चंद्रकांत तांबे, देवराज तांबे, प्रीतम रुके, सिद्धार्थ सावंत, संदेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.