loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरोड्यात दळवींच्या 'सावित्री' नाटकावर चर्चा

सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या खुल्या साहित्य चर्चेत आज जयवंत दळवी यांच्या ‘सावित्री’ या नाटकावर चर्चा करण्यात आली. साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी श्री.विनय सौदागर यांनी या नाटकाचे कथानक सांगून नाटकामधील पात्रांचा परिचय केला.पती - पत्नीच्या वैवाहिक जीवनातील ताणलेल्या नातेसंबंधांचे चित्रण करणारे हे नाटक रसिकाला विचारप्रवण करणारे असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोखंदळ वाचक श्रीमती सरोज रेडकर यांनी हे नाटक रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारे असल्याचे या वेळी बोलताना सांगितले. तदनंतर झालेल्या चर्चेत गजानन मांद्रेकर,जयदीप देशपांडे,सोमा गावडे,अविनाश जोशी,अर्चना लोखंडे,प्राची पालयेकर,अनिष्का रगजी यांनी भाग घेतला. पती - पत्नीने एकमेकांचे स्वभाव ओळखून एकमेकाला समजून घेतल्यास वैवाहिक जीवनातील ताणतणाव कमी होतील,असे मत चर्चेत सहभागी वाचकांनी मांडले. खुल्या साहित्य चर्चेतील बाविसाव्या पुस्तकावरील या चर्चेच्या प्रारंभी विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,तर शेवटी अनिष्का रगजी यांनी ऋणनिर्देश केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg