loader
Breaking News
Breaking News
Foto

मालगुंड गायवाडी बीच येथे मृतावस्थेत व्हेल मासा

मालगुंड (टाइम्स न्यूज नेटवर्क) : गणपतीपुळे नजीक असणार्‍या मालगुंड गायवाडी येथे भलामोठा व्हेल मासा समुद्रकिनारी मृतावस्थेत लागला. काही दिवसांपूर्वी तो मृत झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येते आहे. समुद्राच्या लाटांबरोबर तो किनार्‍यावर ढकलला गेला मात्र प्रचंड ताकदीचा असल्याने लाटांमध्येच त्याचा मृतदेह पडून राहिला. ओहटी सुरु झाल्यानंतर हे निदर्शनास आले. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी गणपतीपुळे पोलीस चौकी जवळ संपर्क साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत, पोलीस पोलीस कॉन्स्टेबल ओंकार आदींनी घटनास्थळी भेट दिली तसेच वनविभागाचे वनक्षेत्रपाल कांदळवन किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडू, कर वनरक्षक प्राजक्ता चव्हाण, शुभम भाटकर, प्रकल्प समन्वय पशुधन पर्यवेक्षक निलेश वाघमारे, कासव मित्र आदर्श मयेकर तसेच ग्रामस्थांनी हा मासा बाहेर काढण्यासाठी मदत केली व वनखात्याने मृत व्हेल माशाला मोठा खड्डा खणून विल्हेवाट लावली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg