loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा हर्णे बंदरातील मासळी व्यवसायाला फटका

दापोली (इक्बाल जमादार) : अमेरिकेच्या नवीन टेरिफ धोरणामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मासळी व्यवसायाला फटका बसला आहे. कोळंबीचे दर ८० टक्क्यांनी घसरले असून ३५० रुपये प्रती किलो दराने विकली जाणारी कोळंबी ही ७० रुपयांपर्यंत घसरली आहे तर अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे निर्यातीदरम्यान पूर्वीच्या ६ टक्क्यांऐवजी २६ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे या धोरणामुळे मासळी व्यवसाय चांगलाच कोंडीत सापडला आहे.कोळंबीमुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदराला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते तर भारतातील कोळंबीचे जगात सर्वात जास्त आयात करणारा देश हा अमेरिका आहे. त्यात काही विशिष्ठ जातीच्या कोळंबीला मागणी जास्त असते. मात्र, अमेरिकेच्या ट्रम्फ सरकारच्या टैरिफ धोरणामुळे कोळंबी व्यवसायास घरघर लागली आहे. त्यामुळे येथील अर्थकारण मंदावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टॅरिफ वाढल्याने अमेरिकन ग्राहकांसाठी कोळंबीचे दर आवाक्याबाहेर जाणार आहेत, त्यामुळे भविष्यात अमेरिकी नागरिक कोळंबीकडे पाठ फिरवू शकतात. यामुळे भारताला जवळपास १ अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. दापोतील हर्णे बंदरात आधीच मत्स्य दुष्काळासह सातत्याने नैसर्गिक संकटे तसेच वादळस्थिती अशी संकटे कायम आहेत.

टाइम्स स्पेशल

पर्सनेट मासेमारी, एलईडी मासेमारी अशी संकटेही याबंदरात मच्छीमारांसमोर आहेत. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवलंबलेल्या नव्या टॉरफ धोरणामुळ बंदरातील मच्छीमार आर्थिक संकटात सापडणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg