रायगड जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही दुचाकींचे अपघात होऊन तरुणवर्ग मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अलिबाग तालुक्यातील एसटी बस स्थानक, चेंढरे बायपास, वायशेत येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तरुणांचे बळी गेले आहेत. अलिबाग तालुक्यात गेल्या वर्षभरात दुचाकींचे ३४ अपघात झाले आहेत. त्यात २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे अनेकांची बळी तर जात आहेतच शिवाय त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबही निराधार होत असल्याने वाढत्या अपघातांची समस्या गंभीर बनत चालली आहे. वाढत्या शहरीकरणामुळेजिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे. व्यवसाय आणि नोकरीनिमित्त दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी वाढत आहेत. त्याबरोबर बाजारात येणारी नवनवीन वाहने खरेदी करण्याची क्रेझही तितकीच आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन हे अनेकांसाठी अत्यावश्यक बाब बनले आहे. मात्र वाहन वापर वाढत असताना वाहतुकीच्या नियमांबाबत अद्यापही जागरुकता दिसून येत नाही.
वाहनचालकांचा बेदरकारपणा आणि वाहतुक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरते. देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करायला हवे. वेग मयदिवर नियंत्रण ठेवायला हवे. पोलीस विभागाकडून चालकांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न करण्यात येत असतात. तरी अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. तरुणवर्गावर वाहनाच्या वेगाची नशा असल्याचे चित्र आहे.शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाड्यांचे टायर फुटणे हीसुद्धा अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. या शिवायदारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. त्याचबरोबर रस्त्यासारखी मूलभूत सुविधा अपुरी आहे. अरुंद रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, साईडपट्ट्यांचा अभाव, दुभाजक, दिशादर्शक, गतिरोधकांचा अभाव दिसून येत आहे, यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याशिवाय रायगड जिल्हयात पर्यटकांची संख्या वाढत आहे. अपघातांच्याही घटना घडत आहेत. गेल्या महिना -सव्वा महिन्यात अलिबाग तालुक्यातील एसटी बस स्थानक, चेंढरे बायपास, आणि अलिबाग-रेवस मार्गावरीलवायशेत येथे झालेल्या दुकाचर्चीच्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये जयदीप बना (वय १७), मिथील सुतार (वय ३४) आणि केतन भगत (वय ३५) या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
टाइम्स स्पेशल
एकट्या अलिबाग तालुक्यात २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत १९ अपघात झाले असून त्यात ११ जणांचा मृत्यू होऊन १२ जखमी झाले आहेत. मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत ३ अपघातात दोन मृत्यू व दोन जखमी झाले आहेत. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील १२ अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ११ जखमी झाले आहेत.अलिबाग तालुक्यात गेल्या सव्वा वर्षात दुचाकीस्वारांचे ३४ अपघात झाले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जखमी झाले आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.