खेड (प्रतिनिधी):--- काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष व कोकण प्रभारी सुनिलभाऊ सावर्डेकर यांनी काँग्रेसला राम- राम करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मा.आ. लहू कानडे, आ. शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे कोकण विभागातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुनीलभाऊ सावर्डेकर यांच्यासह सर्वांचे ना. पवार व खा. तटकरे यांनी स्वागत करीत आपल्या सर्वांचा योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही दिली. काँग्रेस पक्षाचे नेते असलेल्या सुनिलभाऊ सावर्डेकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांचे रत्नागिरी जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असून यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप करीत काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वासह पदांचे राजीनामे देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.
यानुसार मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व आ. शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस व शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे ना. पवार व खा. तटकरे यांनी स्वागत केले. प्रवेशकर्त्यांमध्ये काँग्रेस ओबीसी विभाग सचिव सूर्यकांत आंब्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पनवेल सचिव रामदास नारकर, काँग्रेस खारघर शहर सचिव अविनाश वाळीजकर, युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हा माजी अध्यक्ष अल्पेश मोरे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनाथ आडिवरेकर, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष उत्तम चौहान, काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष महैनदिन सय्यद, काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अनुसूचित जाती विभाग सचिव केतन पेवेकर, काँग्रेस अपंग विभाग पनवेल जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, खारघर शिवसेना विभाग प्रमुख वैभव दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पनवेल शहराध्यक्ष मनोज महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खारघर शहराध्यक्ष संतोष आसबे, संजय मोहिते, संदीप बिदाने, हेमंत जोशी, किशोर ठाकूर, सुनील सूर्यवंशी, अमित मिता, प्रवीण लोमटे, सविता पाटेमोडे यांचा समावेश आहे.
टाइम्स स्पेशल
या प्रवेशाबद्दल सुनील भाऊ सावर्डेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आपण गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होतो. आपल्यावर पक्षाने दिलेल्या पदाना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळचेपी होऊ लागली. या साऱ्या प्रकाराला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे जी आपल्याला जबाबदारी देतील ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू व कोकण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपले नक्कीच योगदान राहील असा, विश्वास दिला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.