loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुका काजू उत्पादक संस्थेचा उपक्रम, यंदा काजू लागवडीचे प्रशिक्षण देऊन उत्पादन वाढीवर भर देणार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा तालुका काजू फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या कार्यालयामध्ये काजू बोर्ड वेंगुर्लाचा अंतर्गत समन्वयक संस्था दिगंत स्वराज फाउंडेशन यांच्यावतीने पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार तालुका मधील काजू लागवड केलेले शेतकरी अभ्यास दौर्‍याला आले. कोकणपट्‌ट्यातील रत्नागिरी जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा लांजा तालुक्यातल्या काजू उत्पादनाचा प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी सर्व शेतकरी व मार्गदर्शक कंपनीच्या व्यवस्थापकीय सदस्यांच्या मार्फत संवाद साधला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमात काजू बोर्डाच्या संलग्न असणार्‍या दिगंत स्वराज्य फाउंडेशन संस्था यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्हा १००० एकर काजू रोपांचे वितरण आणि संगोपनाच्या दृष्टिकोनातून शेतकर्‍यांसाठी मोफत काजू रोप लागवडीसाठी चालू सन २०२५ पावसाळी हंगामासाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी लांजा तालुक्यातील काजू लागवड इच्छुक शेतकरी यांनी लांजा तालुका काजू फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड, लांजा तालुका यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून काजू बोर्डाच्या संलग्न असणार्‍या दिगंत स्वराज फाउंडेशन काजू रोपे वाटप करणार्‍या संस्थेच्या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg