मुंबई : राज्यातील महसूल विभागाचे काम अधिक सक्षमपणे आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून व्हावे यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना स्पष्ट आणि कठोर आदेश दिले आहेत. आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत तब्बल ५२५ अधिकारी सहभागी झाले होते. प्रत्येक तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी जनतेला भेटण्यासाठी निश्चित वेळ ठरवावी आणि तो वेळ स्पष्टपणे कार्यालयाबाहेर फलकावर लिहावा. नागरिकांची कामे प्राधान्याने व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महसूलमंत्री बावनकुळे त्यांनी दिला.
महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही अधिकाऱ्याची बदली आमदारांच्या शिफारशीनुसार केली जाणार नाही. महसूल खाते कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करणार नाही. फक्त कामगिरीच्या आधारेच निर्णय घेतले जातील. १५ ऑगस्ट रोजी उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. विधिमंडळात त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारा ठराव मांडला जाईल, असेही बावनकुळे म्हणाले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.