जागतिक पातळीवर आता मधुमेही रुग्णांसाठी शास्त्रज्ञांनी अधिक संशोधन सुरु केले आहे. दिवसभराच्या अन्नपदार्थांमधून मोठ्या प्रमाणात साखर शरीरात जात असते आणि कष्टकरी मजूर यांच्यासारखे घाम गाळणे सर्वांना शक्य नाही. त्यामुळे शरीरात गेलेली साखर साठवली जाते आणि मधुमेही रुग्णांना या साखरेचा सामना करावा लागतो. त्यातच दिवसभरात पाच ते सहा कप चहा पिणार्यांची मधुमेहींची संख्या ६० टक्क्यांपर्यंत आहे. मधुमेही रुग्णांसाठी साखर ही एखाद्या विषापेक्षा कमी नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. शुगर पातळी नियंत्रित केली गेली नाही तर अनेक घातक आजारांना सामोरे जावे लागते. डायबेटीजमध्येच डाय हा शब्द आहे. डाय म्हणजे मरण. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकारी मधुमेही रुग्णांना तीन महिने चहा व गोड पदार्थ घेऊ नयेत व परिणाम पहावे, असा सल्ला देत आहेत.
जगायचे आहे तर काही गोष्टी नियंत्रणात आणाव्या लागतील. गोळ्या खाऊन शरीराला अनेक व्याधी ग्रस्त करण्यापेक्षा सुदृढ राहण्यासाठी व आयुष्यमान वाढविण्यासाठी चहा व गोड पदार्थापासून मधुमेही रुग्णांनी चार हात लांब राहणे फार कठीण नाही. पैसे आहेत म्हणून गोड पदार्थ खात राहणे फार धोक्याचे आहे. ८० टक्के उपचार हे स्वतःच रुग्णांनी करावयाचे असतात. २० टक्के डॉक्टरांवर सोपवायचे असतात, अशी माहिती रत्नागिरीतील प्रसिद्ध मधुमेह व हृदयरोगतज्ञ डॉ.सुजित जाधव यांनी टाइम्सकडे बोलताना दिली. ते म्हणाले, रुग्णांनी स्वतः पथ्य पाळले तर हा आजार बळावत नाही. दरदिवशी किमान चालणे आणि स्वतःच्या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. वेळेवर झोप घेणे व दिवसातून किमान चारवेळा जेवण करणे मधुमेही रुग्णांसाठी अत्यावश्यक आहे. किमान चार तासाने मधुमेही रुग्णांनी काही खायला हवे. पण आजच्या स्थितीत दुपारी एक नंतर रात्री ९ ते १० वाजेपर्यंत रुग्ण चहा बिस्कीट खातात आणि आजाराला ओढवून घेतात. त्याऐवजी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान एखादा नाश्ता करणे आवश्यक आहे. गोळ्या आयुष्य वाढवू शकत नाहीत आणि गंभीर स्थिती आल्यावर डॉक्टरही काही करु शकत नाहीत, याचा विचार करा.
मधुमेह रुग्ण जे उपचार करतात त्यातील अनेक औषधे शरीराला घातक आहेत. हे जगातील अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. गोळ्या खाऊन मधुमेह बरा होत नाही उलट त्याचा किडनीवर परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी तीन महिने चहा व गोड पदार्थ खाणे टाळून पाहिल्यास त्यांचा मधुमेह २ पूर्णतः नियंत्रणात येवू शकतो. २५० पेक्षा जास्त प्रमाण असलेल्या मधुमेही रुग्णांनी याचा प्रयोग अवश्य करावा अन्यथा शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, मधुमेह रुग्णांनी स्वतःकडे दुर्लक्ष केल्यास ६० वर्षानंतरचे आयुष्य धोक्याच्या पातळीमध्ये येते. गेल्या ५ वर्षातील हे प्रमाण पाहिले तर ६० ते ७० वर्षाच्या दरम्यान ८५ टक्के रुग्णांनी या जगाचा निरोप घेतला आहे. इतके वास्तव आणि सत्य असताना जगण्यासाठी माणूस साखर सोडू शकत नाही, हे फारच दुःखद आणि संवेदनशील आहे. (रत्नागिरी टाइम्स)
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.