loader
Breaking News
Breaking News
Foto

तेज सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र) सामाजिक संस्थेची निर्मिती; लवकरच कामं सुरु करणार, सौ.येरुणकर यांची माहिती

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : विशेष करून महिला सबलीकरण तसेच अनाथ मुलांना, महिला, पुरुष यांना मदतीचा हात देणे यासह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व क्रीडा विकासासाठी युवक व युवती कल्याण कार्यक्रम, वृद्धाश्रम व अनाथाश्रम यासाठी पुढाकार घेत मुंबई येथून तेज सोशल फाउंडेशन (कार्यक्षेत्र महाराष्ट्र) या सेवाभावी सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ.चैतालीताई येरवणकर यांनी पत्रकारांना दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या याबाबत पुढे म्हणाल्या की, सर्वसामान्य जनतेला मदत करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी शासनाच्या विविध जन कल्याण योजना यांची मदत घेणार आहोत. या संस्थेत विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते कामं करणार आहेत. जिल्हा स्तरावर विविध भागात तेज सोशल फाउंडेशन या संस्थेचे लवकरच सामाजिक कामं संस्था नोंदणी नंतर सुरु करण्यात येणार आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई जोगेश्वरी येथे असणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. चैतालीताई येरुणकर यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg