खेड (प्रतिनिधी) - शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड ता. खेड, जि. रत्नागिरी या पतसंस्थेच्या शाखा चिपळूण येथे दिनांक २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे महापूराचे पाणी पतसंस्थेत येऊन पतसंस्थेचे रुपये एकोणीस लाख अठूठयाऐंशी हजार पाचशे मात्रचे नुकसान झाले होते. शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड, या सहकारी पतसंस्थेने सदर शाखेचा दि न्यु इंडिया इंन्शुरन्स कं. लि.या कंपनीचा विमा उतरविला होता.
शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेने दिनांक २७/०७/२०२१ रोजी दि न्यु. इंडिया इंन्शुरन्स कं. लि. विमा कंपनीकडे नुकसान भरपाई करीता दावा केला होता. सदर विमा कंपनीच्या खेड शाखेमध्ये वेळोवेळी लेखी अर्ज देऊन देखील तेथील शाखा व्यवस्थापक यांनी आमचे पतसंस्थेत अत्यंत हिन दर्जाची वागणुक दिली व उर्मट त्रास देखील दिला. त्यानंतर नाममात्र रक्कम रुपये ७५,०००/- दिनांक १२/८/२०२१ रोजी पतसंस्थेच्या खात्यात वर्ग केले त्यानंतर पंचनामा करुन दिनांक २३/१२/२०२१ रोजी रक्कम रुपये १,८१,१४१/- पतसंस्थेला विमा रक्कम देउन बोळवण केली. त्यानंतर सदर नुकसान भरपाई नाममात्र असल्याने पतसंस्थेचे वकील ऍड. केतन सदाशिव पाटणे यांनी विमा कंपनीला ३१/०३/२०२३ रोजी कायदेशिर नोटिस पाठवली. दिनांक १७/०७/२०२३ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली त्यानंतर दिनांक १/११/२०२३ रोजी विमा कंपनीने फेर सर्वे रिपोर्ट तयार करुन रुपये ३,९२,९१३/- रक्कम अदा केली. परंतु एकुण रूपये १९,८८,५००/- चे नुकसान झाले होते, त्यापैकी फक्त ६,४९,०५४/- इतकी रक्कम विमा कंपनीने पतसंस्थेला देवू केली म्हणजे जेमतेम नुकसानीच्या १/३ रक्कम दिली. सतत दहा वर्षे १२ लाख विमा हप्ता भरून एक वर्ष आपत्ती ओढवल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देत नसेल तर या विमा कंपनीकडे विमा उतरवणे ग्राहकाला काय उपयोगाचे? असा युक्तीवाद पतसंस्थेच्या वकिलांनी केला.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रत्नागिरी अध्यक्ष अरुण रा. गायकवाड, सदस्य स्वप्नील द. मेढे, सदस्या अमृता नि. भोसले यांनी दिनांक २२/०८/२०२४ रोजी पतसंस्थेच्या बाजूने निकाल देत पतसंस्थेला अजून नुकसान भरपाई म्हणून रुपये २,६४,९७२/- व त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे ९% टक्के दराने पुर्ण रक्कम अदा होई पर्यत व्याज अदा करावे असा आदेश पारीत केला तसेच पतसंस्थेला झालेल्या त्रासापोर्टी रक्कम रुपये २५,०००/- तक्रार खर्च म्हणुन रुपये १५,०००/- मात्र दयावे असा निकाल दिला. त्याप्रमाणे विमा कंपनीने पतसंस्थेला रुपये ९,८८,०६६/- इतकी रक्कम दिली. सदर कामी पतसंस्थेचे सर व्यवस्थापक विशाल म्हादलेकर व कर्ज वसुली व्यवस्थापक शशांक बुटाला यांनी योग्य पाठपुरावा केला व पतसंस्थेच्यावतीने ऍड केतन सदाशिव पाटणे यांनी कायदेशीर कामकाज पाहिले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.