loader
Breaking News
Breaking News
Foto

आता 'राम दरबार' साठी अयोध्या नगरी पुन्हा सजणार; ६ जूनपासून राम दरबारात भाविकांना दर्शन घेता येणार

अयोध्ये मध्ये राम मंदिर भाविकांना खुले झाल्यानंतर आता 'राम दरबार' देखील सजणार आहे. पुढील महिन्यात 3 दिवसीय सोहळ्यानंतर भाविकांना राम दरबार चे दर्शन 6 जून 2025 पासून घेता येणार आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबारात मुर्त्या स्थापन केल्या जाणार आहेत. राम मंदिर निर्माण समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी राम दरबार स्थापनेला दुजोरा दिला आहे. राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. आता त्या कार्यक्रमाच्या तुलनेत या कार्यक्रमाची भव्यता कमी असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राम दरबारातील मूर्तींच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात जल-वास, अन्न-वास, औषधी वास आणि शैय्या-वास यासह धार्मिक विधी होतील, अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. 23 मे रोजी भगवान श्रीरामाचे भाऊ आणि देवी सीतामाईची मूर्ती अयोध्येत येणार आहे. त्यानंतर त्या मूर्त्या राम दरबारात स्थापित केल्या जातील. राम दरबारातील प्रतिष्ठापना समारंभात अनेक विधी असतील परंतु 22 जानेवारी 2024 रोजी प्राण प्रतिष्ठान दरम्यान केल्या जाणाऱ्या प्रमाणात नाहीत. विधी 5 जून रोजी संपतील आणि 6 जूनपासून राम दरबार भाविकांसाठी खुला होईल.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

23 मे ते 5 जून या कालावधीत शुभ ग्रहांची स्थिती असल्याने मंदिर प्रशासनाने 23 मे रोजी प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूरमधील पांढऱ्या संगमरवरात कोरलेली पाच फूट रामाची मूर्ती राम दरबाराचा एक भाग आहे. सोबतच सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्ती देखील असतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg