loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुका कुंभार समाजाच्या गावभेटीला उत्स्फुर्त प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुका कुंभार समाजाच्या गावभेट सभांना तालुक्याप्रमाणे दाभोळ, कलानगरसह चोवीस गावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला उपस्थित समाज बांधवांनी नवीन कमिटीचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले. त्याचप्रमाणे आपली समाजाप्रती भावना व्यक्त करताना, समाज बांधवांनी समाज प्रेम व्यक्त केले. आपल्या सर्वांची स्वप्न, समाजाची ध्येयधोरण सर्वांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास नेण्यासाठी, समाजाला गतवैभव मिळवून देण्यासाठी समाजाची ही नवीन कमिटी कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष मिलिंद ईवलेकर यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१४ एप्रिल २०२५ रोजी दापोली तालुका कुंभार समाजाची सर्वसाधारण सभा सकाळी १०.३० वाजता साखलोली पडवेकरवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जास्तीतजास्त समाज बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन दापोली तालुका कुंभार समाज कमिटीने केले आहे. माजी अध्यक्ष डॉ. दिलीप तळदेवकर यांनी मनोगातामध्ये स्पष्ट केले की, जबाबदारी पार पाडत असतांना पदरी अपयशच, निराशा, तरीही धेय्य सोडलं नाही. समाजहितासाठी विद्यमान अध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करत रहाणार. तब्येत साथ देत नाहीये तरीही दोन्ही पाय मोडले तरी समाजासाठी धावण्याचा प्रयत्न करेन. समाजाची वास्तू उभी राहिल्याशिवाय आम्हाला मरणही येणार नाही. समाजाचा उध्दार करून घेण्यासाठी नुतन अध्यक्षांना साथ देण्याचे आवाहन माजी अध्यक्ष डॉ. दिलीप तळदेवकर यांनी केलं.

टाइम्स स्पेशल

दाभोळ, कलानगर येथे झालेल्या सभांसाठी अध्यक्ष मिलिंद ईवलेकर, माजी अध्यक्ष डॉ. दिलीप तळदेवकर, सचिव प्रमोद निवळकर, उपसचिव नरेश दाभोळकर, खजिनदार संतोष खेडेकर, माजी उपाध्यक्ष रविकांत पादड, माजी सचिव सदस्य दीपक परबलकर, माजी उपसचिव सदस्य शाम लांजेकर, सोशल मीडिया अध्यक्ष सदस्य महेश लांजेकर, सदस्य जितेंद्र पडवेकर, सदस्य प्रमोद खेडेकर, सदस्य राकेश पालवणकर, सदस्य विजय मांडके, केळशी गावचे समाजसेवक विनोद खेडेकर, दाभोळ गावचे अध्यक्ष नरेश दाभोळकर, कलानगर गावचे अध्यक्ष प्रकाश पडवेकर तसेच दाभोळ व कलानगर गावचे समस्त समाज बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg