loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेच्या ‘एक समाज एक संघ’ समाज एकता मनसे चषकाचे अनावरण, टी-शर्ट वाटप

वरवेली (गणेश किर्वे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित" एक समाज एक संघ"समाज एकता मनसे चषकाचे अनावरण सर्व समाज अध्यक्ष, संघ कर्णधार व सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीत चिखली ओंकार मंगल कार्यालय, चिखली येथे मोठ्या दिमागदार कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी स्पर्धा आयोजक मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचे उपस्थित सर्व समाजाचे अध्यक्ष, संघाचे व्यवस्थापक व कर्णधार तसेच खेळाडू यांचे स्वागत केले.मनसेच्या ‘एक समाज एक संघ’ ही क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक ११ ते १४ एप्रिल या कालावधीत शृंगारतळी जानवळे फाटा येथील मैदानावर संपन्न होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने मनसे संपर्क अध्यक्ष व आयोजक प्रमोद गांधी यांनी सर्व समाज अध्यक्षांना एकत्र आणण्यासाठी व आपल्या स्पर्धेची भूमिका मांडण्यासाठी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सर्व समाजबांधव, संघ मालक,कर्णधार व खेळाडू उपस्थित होते. यावेळी खारवी, मुस्लिम समाज,भंडारी सुतार, भाविक गुरव, मुस्लिम, वाणी, नंदीवाले,तेली, बौद्ध, बेलदार, कुणबी मराठा आदी समाज अध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन प्रमोद गांधी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, सर्व उप तालुका अध्यक्ष, गट अध्यक्ष, शाखा अध्यक्ष यांच्यासह सर्व समाज अध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये अनेक समाज अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करून प्रमोद गांधी हे करत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg