loader
Breaking News
Breaking News
Foto

लग्न पंगतीतून वांगी-बटाटे गायब; पसंती कोणाला?

पूर्वी लग्नसमारंभात मोजके व ठराविक पदार्थ असायचे. सर्वसामान्यांच्या समारंभात पंगतीला वांग-बटाटा भाजी हमखास असायची. मात्र, काळाच्या ओघात ही भाजी कालबाह्य झाली असून, त्याऐवजी मटार-पनीरचा समावेश झाला आहे. दोन-चार पदार्थांऐवजी अधिकाधिक वेगवेगळ्या फॅन्सी पदार्थांचा समावेश सुरू झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुठल्याही समारंभात वेलकेम ड्रिंक प्राधान्याने दिले जात आहे. उन्हाळा आहे, परंतु कोकम सरबत, आवळा सरबत, कैरी पन्हे याऐवजी मोसंबी, कलिंगड, संत्र्याच्या ज्यूसला अधिक पसंती आहे. जेवणापूर्वी सूप, स्टार्टर घेतले जातेः त्यामध्येही असंख्य प्रकार आहेत. मुख्य जेवणामध्येही अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. पूर्वी जेवणात साधा भात, वरण, रस्सा भाजी, सुकी भाजी, भजी, मठ्ठा, पुरी, श्रीखंड, जिलेबी यासारख्या पदार्थांचा समावेश होता. मात्र, हे पदार्थ कालबाह्य झाले आहेत. जिरा राइस, दालफ्राय, पुलाव, बिर्याणी, रोटी, मिक्स सब्जी, पनीर चिली, मटार पनीर, पापड, कोशिंबिरीचे विविध प्रकार यांचा समावेश होऊ लागला आहे. जेवणाची चव बदलली असून, स्टाईलही बदलली आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg