loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशीच्या संकटग्रस्त भगिनीला प्राथमिक शिक्षकांनी केली आर्थिक मदत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : साटेली भेडशी येथील श्रीम. अंकिता अर्जून नाईक यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भयानक स्फोटात नाईक कुटूंबाचे फार मोठ नुकसान झालं. नविन घराच स्वप्न साकारायला निघालेल्या या सामान्य परिवाराचे क्षणार्धात होत्याचे नव्हत झाले. या कठीण प्रसंगात श्रीम. नाईक व त्याच्या मुलाला आधार देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी आर्थिक मदत केली. कै. सखाराम झोरे यांच्या सामाजिक कार्याची आठवण जपत त्यांच्या मित्र परिवाराने ही आर्थिक मदत करायचं ठरवल व तात्काळ ही मदत सरपंच सेवा संघाचे प्रमुख प्रविण गवस, साटेली भेडशीच्या सरपंच सौ. छाया ताई धर्णे, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, अमित सडेकर, बोडदे गावचे संदिप लक्ष्मण नाईक व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक दयानंद नाईक व राकेशभाई कर्पे व शिक्षक मित्रांच्या हस्ते नाईक कुटुंबाला मदत देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षकांनी ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबर सामाजिक कार्याची परंपरा पार पाडली. याबद्दल प्रविण गवस, सौ. छाया धर्णे यांनी कौतुक केले व आभार मानले. आमच्या कै. सखाराम झोरेचे सामाजिक काम आम्ही असच पुढे चालू ठेवू, असे आश्वासन या शिक्षक मित्राचे प्रमुख अरुण पवार, रवि देसाई, जनार्दन पाटील, मणिपाल राऊळ, श्रीम. प्राची गवस, सौ. पूजा जयेंद्र बिर्जे व महेश नाईक यांनी दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg