loader
Breaking News
Breaking News
Foto

हजारो वृक्षतोड सपाटीकरण प्रकरणी वनविभागाने तातडीने कारवाई केली नाही तर तक्रार दाखल करणार : फ्रान्सिस लोबो

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यात न्यायालयाने संपूर्ण वृक्षतोडीला बंदी घातली आहे. पण दोडामार्ग तालुक्यात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत अनेक ठिकाणी वन विभाग यांच्या संगनमताने खुलेआम वृक्षतोड सुरू आहे. पाळये गावात केरळमधील काही परप्रांतीय यांनी कित्येक एकर जमीन अननस लागवड नावाखाली भाडेतत्त्वावर घेतली. या ठिकाणी इतर भागधारकांना अंधारात ठेवून या ठिकाणी जमीन सपाटीकरण नावाखाली जेसीबी, बुलडोझर, लावून हजारो झाडे उखडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा विध्वंस्त केला आहे. दोडामार्ग वन अधिकारी यांनी तातडीने कारवाई केली नाही तर न्यायालयीन आदेश याबाबत मुख्य वनसंरक्षक नागपूर तसेच न्यायालयात तक्रार करणार असे फ्रान्सिस लोबो यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाळये गावात गेल कंपनी गॅस वाहिनी लागून असलेल्या कित्येक एकर जमीनीमध्ये केरळमधील लोकांनी धुडगूस घातला आहे. सर्व सामान्य शेतकरी यांनी झाडे तोडली तर कायद्याचा बडगा दाखवला जातो. पण गेल्या काही वर्षांत दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी आहे. पण परप्रांतीय डोंगर सपाटीकरण नावाखाली हजारो झाडे नेस्तनाबूत करत आहेत. यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीमध्ये शिरत आहेत, हल्ला करत आहेत. याला सर्वश्री वन विभाग जबाबदार आहे. असा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.

टाइम्स स्पेशल

पाळये गावात फ्रान्सिस लोबो, शिवराय शिरवलकर, संजय गावकर, महेंद्र नाईक, संजना गवस यांनी पाळये गावात जमीन खरेदी केली आहे. पण धडे वाटप झाले नाही. असे असताना काही जणांनी केरळमधील लोकांना अननस लागवड करण्यासाठी तीस ते चाळीस एकर जमीन दिली. या ठिकाणी गेले पंधरा दिवस सपाटीकरण नावाखाली जेसीबी, मशिन, बुलडोझर लावून हजारो झाडे उखडून गाडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्‍हास केला आहे. या बाबत संबंधित तक्रारदार यांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे. पण आठवडा झाला तर वन विभाग कडून संबंधित परप्रांतीय केरळीयन यांची पाठराखण करून न्यायालयीन आदेश याचा वन अधिकारी व कर्मचारी भंग करत आहेत. बंदी असताना हे घडते कसे? तेव्हा दोन दिवसात कारवाई झाली नाही तर मुख्य वनसंरक्षक नागपूर येथे तसेच न्यायालयात तक्रार दाखल करणार असे फ्रान्सिस लोबो व इतरांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg