loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रीडा शिक्षक अजय शिंदे यांना क्रीडा दूत पुरस्कार प्रदान ---

मालवण (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यामध्ये सलग 25 वर्षे क्रीडा समन्वयक हे पद यशस्वी सांभाळणारे श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. अजय मालती मधुकर शिंदे यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते क्रीडा दूत या पुरस्काराने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, लिपिक श्री. सुरेकर, नंदकिशोर नाईक, विजय मयेकर, हनुमान सावंत, संजय परब ,बयाजी बुरान, उत्तरेश्वर लाड हे क्रीडा समन्वयक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण तालुक्यात तालुका क्रीडा समन्वयक म्हणून सन 2001 पासून आज पर्यंत 25 वर्षे अजय शिंदे यांनी भरीव कार्य केले आहे. अजय शिंदे यांनी अनेक वर्षापासून क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाशिक्षक खेळाडू यांना मार्गदर्शन करून क्रीडा व शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच शिंदे यांच्या परिश्रमामुळे अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. अजय शिंदे हे क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ या रजिस्टर मान्यताप्राप्त एकमेव संघटनेचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर विभागाचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य संघटक म्हणून काम पाहत आहेत. श्री शिंदे यांना मिळालेल्या क्रीडा दूत या पुरस्कारामुळे त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन चे अध्यक्ष विलास झाड, उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, खजिनदार विनायक निवेकर, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg