loader
Breaking News
Breaking News
Foto

धाविरदेव महाराज यात्रेच्या पूर्वसंधेला म्हसळा येथे भव्य शोभा यात्रा ---

म्हसळा येथील श्री धाविरदेव महाराज यांच्या यात्रेचे आयोजन शुक्रवार 11 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रेच्या पूर्वसंधेला आज दिनांक 10 एप्रिल रोजी विन्हेरे येथील खालू बाजा पथककाच्या तालावर महिलांकडून लेझीम नृत्य करून श्री धाविर महाराज यांच्या पालखीची भव्य आणि दिव्य अशी शोभा यात्रा धाविरदेव महाराज मंदिर ते संपुर्ण म्हसळा शहर व पुन्हा श्री धाविर देव मंदिर अशी काढण्यात येऊन यात्रेची जनजागृती करण्यात आली. या शोभा यात्रेत लहानात लहानापासून अगदी वृद्धापर्यत सर्व म्हसळा वासीय सहभागी झाले होते. श्री धाविरदेव महाराज मंदिरात पहाटे साडेपाच वाजता अभिषेक, पूजा आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शोभा यात्रेत हिंन्दू समाज अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, सोनार समाज अध्यक्ष सुनील उमरोठकर,कुंभार समाज नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष सुनील अंजर्लेकर, पेटकर समाज अध्यक्ष दिलीप पानसारे, शिंपी समाज अध्यक्ष अमर करंबे, तांबट समाज अध्यक्ष भालचंद्र करडे, नाभिक समाज अध्यक्ष सुशील यादव, नगराध्यक्ष संजय कर्णिक, धावीर देव महाराज पुजारी म्हशीलकर बंधू, प्रसाद पोतदार, ब्राम्हण समाज अध्यक्ष भालचंद्र दातार,गवळी समाज अध्यक्ष अशोक काते, बेलदार समाज अध्यक्ष हिरामण चव्हाण,समिर बनकर,चर्मकार समाज अध्यक्ष, स्वप्निल चांदोरकर,विकास धारिया, गौरी पोतदार, गौरव पोतदार, सौरव पोतदार, रेश्मा कानसे, संपदा पोतदार, गणेश बिरवाडकर, दिनेश म्हशीलकर, कविता बोरकर, नीता ढवळे, राजू म्हशीलकर, वासंती म्हशीलकर, शोभा म्हशीलकर, योगेश करडे, गौरव पोतदार, भाई बोरकर, महिला मंडळ आदि मान्यवरांसह संपुर्ण हिंन्दू समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg