loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जी बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी बाबाजी शिर्के ---

संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- खेड तालुक्यातील लोटे केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री. बाबाजी जयराम शिर्के यांची खेड तालुक्यातील कर्जी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लोटे केंद्राचे आदर्श, क्रियाशील व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार व अनुभवी, श्री शिर्के यांनी 39 वर्ष शिक्षण सेवेमध्ये वाहून निरंतर असे शैक्षणिक काम केल. तसेच संघटनात्मक काम करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्षपद तसेच रत्नागिरी जिल्हा केंद्रीय प्रमुख संघटनेचेही जिल्हाध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे. तसेंच रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे काम केले. प्रशासन व शिक्षक संघटना यांच्यात योग्य समन्वय घडवून शिक्षणाला योग्य दिशा देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी संघटनेमध्ये अनेक क्रियाशील कार्येकर्ते घडविले आहेत. आज त्यांची कर्जी बीटचे विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेकडून नेमणूक झाली आहे. त्यांच्या या कार्याचा हा एक प्रकारे गौरवच आहे. कर्जी बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारी पदी नेमणुक झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनदंन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg