loader
Breaking News
Breaking News
Foto

मांगेली तळेवाडी येथे मधमाशांच्या हल्यात गंभीर जखमी युवकाचे निधन; गावात हळहळ ---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- रामनवमी दिवशी मांगेली तळेवाडी येथे आपल्या काजू बागेत काजू गोळा करायला गेलेल्या रामदास गोविंद गवस या युवकावर अचानक शेकडो मधमाशानी हल्ला चढवला होता. नाका तोडांला शरीराला गंभीर इजा केल्या होत्या. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालय येथे दाखल करून गोवा येथे हलविले होते. अखेर गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी मधमाशांना धुराच्या सहाय्याने हुसकावून लावून जखमी रामदास याला बांबोळी गोवा येथे हलविले होते. पण गुरुवारी त्याच्या निधनाची बातमी पसरली आणि मांगेली गावात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, असा परिवार आहे. दोडामार्ग तालुक्यात गुरुवारी पोलीस दिपक सुतार यांचे हदय विकाराच्या झटक्याने निधन तर मधमाशी हल्यात जखमी रामदास गवस याचे निधन झाल्याने या दोन्ही घटना मनाला चटका देवून जाणार्‍या ठरल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg