loader
Breaking News
Breaking News
Foto

साखर गावच्या श्री कालिकामाता देवीचा वार्षिक भव्य यात्रौत्सव 17 रोजी ---

खेड(प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील निसर्गरम्य साखर गाव आणि या गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान, पंधरागावच्या ऐतिहासिक गादीचा वारसा असलेली आदीमाया आदीशक्ती श्री कालिकामाता देवीचा वार्षिक यात्रौत्सव चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी गुरूवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी सकाळी ठिक 8 वाजता गावातील बहूसंख्य ग्रामस्थ देवीच्या वार्षीक परंपरेनूसार मानकर्‍यांकडे जाऊन त्यांचे शुभहस्ते लाटेची विधीवत पुजा करून घेतात. आणि त्यानंतर देवीची लाट तोडून देवीच्या यात्रौत्सवास सुरवात करतात. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, गुहागर या तालूक्यांतील तसेच दुर-दुरवरून भाविक भक्तजन मोठ्या उत्साहाने येतात. आई कालिकामाता नवसाला पावणारी आणि एक जागृत देवी म्हणून प्रसिद्ध आहे. नुकतेच देवीचे हेमांडपंथी सुंदर कलाकृती, नक्षीकाम केलेले पाषाणी मंदीर बांधले आहे. शुक्रवार दि. 18 एप्रिल 2025 रोजी, चैत्र कृष्ण पंचमीला देवीचा समा होणार आहे. यात्रेचा मनमोहक, नयनरम्य छबिना सोहळा आणि सौ. छाया आगर नागजकर यांचा सांगली जिल्ह्यातील सुप्रसिध्द लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी सहकुटूंब, सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रौत्सवाचा आनंद व्दिगुणित करावा असे आग्रहाचे निमंत्रण समस्त साखर गाव ग्रामस्थ कमिटी आणि ग्रामीण, मुंबई, पुणे ग्रामस्थ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg