नवनिर्माण शिक्षण संस्थेने रत्नागिरी येथे फिजिओथेरपी पदवी महाविद्यालय सुरु करत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपुर्व योगदान दिले आहे. आजचा नी पेन फिजिओथेरपी मोफत कॅम्प हे या परिसरातील जनतेसाठी अत्यावश्यक सुविधा आहे. संस्थेच्या या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. असे कॅम्पचे उदघाटनप्रसंगी बोलतांना असि. चॅरिटी कमिशनर श्रीमती. सय्यद यांनी विचार व्यक्त केले. यावेळी रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिथय जेष्ट डॅाक्टर रमेश चव्हाण, नवनिर्माण शिक्षण संस्था उपाध्यक्ष आणि परकार हॅास्पिटलचे निर्माते डॉ. अलिमियाँ परकार, आर्थोटीस्ट डॉ. राजेंद्र कशेळकर, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाथरे, संचालक सीमा हेगशेट्ये, संस्था अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, फिजीओ डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये मान्यवरांचे स्वागत करताना रत्नागिरी परिसरातील वैद्यकीय क्षेत्राचा माहिती दिली. रत्नागिरीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचे काम मागील 55 वर्षे डॉ. रमेश चव्हाण तर डॉ. अलीमियॅा परकार 46 वर्षे करत आहेत. रत्नागिरीच्या सुदृढ आरोग्य आणि त्यातील मॅारेलीटी याचे ते पायोनियर आहेत. डॉक्टर कशेळकर कृत्रीम अवयव रोपण क्षेत्रात विशेष कार्य करत आहेत. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण आणि सेवा बजावले पाहिजे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर अलिमियॅा परकार यांनी आपल्या मनोगतातून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी सदैव ऍक्टिव्ह राहिले पाहिजेत. आणि ज्यावेळी डॉक्टर होऊन बाहेर पडाल त्यावेळी निस्वार्थीपणे सेवा बजावली पाहिजे. असे मत व्यक्त केले. डॉ. चव्हाण यांनी नवनिर्माण चे फिजिओथेरपी महाविद्यालय तर्फे गुढगेदुखी मार्गदर्शन मोफत कॅम्पचे विशेष कौतुक केले. सध्य परिस्थितीत यांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. करन कारा, डॉ. अनघा शेळके-शिंदे, डॉ. अनया शिंदे, डॉ. महिमा सावंत यांनी रुग्ण तपासून त्यांना मार्गदर्शन केले. यांत महाविद्यालयाचे 46 विद्यार्थी सहभागी झाले होते. या पुढील काळात एस एम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालय ना नफा ना तोटा या तत्वावर ओपीडी सुरु करणार असल्याचे संचालक ऋतुजा हेगशेट्ये यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. जागतिक आरोग्य दिनी गुढगेदुखी आणि संधीवात फिजिओथेरपी शिबीर संपन्न झाले. अनुष्का शिरसाठ या विद्यार्थीनीने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.