loader
Breaking News
Breaking News
Foto

महाबोधी विहारासाठी ’वंचित’च्या पदाधिकार्‍यांची गावखेड्यात स्वाक्षरी मोहीम

रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाने राज्यासह देशभर संतापाची लाट उसळली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचे मोर्चे, निवेदने देऊन आता प्रत्येक वाडीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू असून त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम सुद्धा चालू आहे. या स्वाक्षरी मोहीम अभियानाला रत्नागिरी जिल्हामधून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून जवळपास पाच ते सहा लाख बौद्ध बांधव स्वाक्षर्‍या करून मोहिमेत सहभागी होतील. असे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मुकुंद सावंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजन कांबळे व त्याचे पदाधिकारी यांच्या समवेत जिल्हा पदाधिकारी हे गेल्या दहा ते पंधरा दिवस गाव भेटी घेत आहेत. आजपर्यंत अनेक विभागामध्ये जाऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का मिळावे याबाबत जनजागृती सुद्धा सुरू आहे. या मोहिमेला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा, तालुका पदाधिकारी देखील सक्रिय सहभागी होऊन मोहीम गतिमान करत आहे. भारतीय बौद्ध महासभेसहित सर्व धार्मिक संघटनाही महिमेला सहकार्य करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg