loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण बसस्थानकची जुनी इमारत पाडताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान

मालवण (प्रतिनिधी) : मालवण बस स्थानकाची नवीन इमारत बांधल्यावर जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही गेले चार दिवस सुरू आहे. सदर कार्यवाही सुरू असताना या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळल्याने दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी सदरचे काम सुरू असताना या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा बसस्थानक परिसरात होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी महामंडळाच्या मालवण बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले नसले तरी सध्या या इमारतीमध्ये कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांचे राहणे सुरू झाले आहे. या इमारतीच्या टेरेसवर दारूच्या बाटल्यांचा खच आणि इतर साहित्य पडल्याचे दिसून आले. यामुळे उद्घाटनाच्या अगोदरच इमारतीची झालेली दुर्दशा पाहून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg