loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित शहा महाराष्ट्र दौर्‍यावर

संगलट (प्रतिनिधी) : ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर येत आहेत. शनिवारी दुर्गराज रायगडला भेट आणि त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमांचे नियोजन आहे. मात्र, यावेळी अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानीही जाणार आहेत. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला विढा यानिमित्ताने सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यासाठी अमित शहा शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल होतील. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या रायगड दौर्‍याला सुरुवात होईल. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्याला भेट, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित शहा येथील कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल होतील. तटकरे यांच्याकडे दुपारच्या भोजनानंतर साडेतीनच्या सुमारास अमित शहा यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईत एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर रात्री ते सह्याद्री अतिथीगृहात पोहचतील. रायगड, नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? दरम्यान, अमित शहा यांच्या या महाराष्ट्र दौर्‍यानंतर महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता आहे. राज्यात 18 जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना तर नाशिकसाठी गिरीश महाजन यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र, शिवसेनेने या दोन्ही जागांवर, त्यातही रायगडसाठी आग्रह धरत आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली. आता अमित शहा हे तटकरेंच्या घरी भोजनाला पोहोचणार म्हटल्यावर रायगडसाठी आग्रही असलेले शिवसेना मंत्री भरत गोगावलेंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg